Hard Skills आणि Soft Skills बद्दल स्पष्टता येण्यापूर्वी एखाद्याने कौशल्यांबद्दल (skills) समजून घेतले पाहिजे.
तर, कौशल्ये (skills) म्हणजे काय?

कौशल्य (skill) म्हणजे एखादे कार्य निश्चित परिणामासह किंवा योग्य अंमलबजावणीसह सामान्यतः वेळेत आणि/किंवा ऊर्जा किंवा दोन्हीमध्ये पूर्ण करण्याची क्षमता. सामान्यत: योग्य कौशल्ये मिळविण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि ज्ञान आवश्यक आहे.
विविध प्रकारची कौशल्ये आहेत जी Domain specific आणि Domain general नावाच्या श्रेणींमध्ये येतात. पण इथे आम्ही हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स बद्दल सांगणार आहोत.
Hard Skills (हार्ड स्किल्स) म्हणजे काय?
Hard skills ही Domain specific किंवा नोकरी विशिष्ट कौशल्ये आहेत. तुम्हाला दिलेले कार्य करण्यासाठी हे आवश्यक आहेत. ही कौशल्ये विविध अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाद्वारे किंवा OJT म्हणजेच ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे मिळू शकतात.
हार्ड स्किल्सची उदाहरणे
अनेक प्रकारच्या hard skills आहेत. खाली या कौशल्यांची उदाहरणे दिली आहेत.
उदा. शैक्षणिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये, संगणक कौशल्ये, कोडिंग, इ.
Resume मध्ये या गोष्टी कुठे समाविष्ट करायच्या?
आधी चर्चा केल्याप्रमाणे, “नोकरी साठी धडपडताय? Resume कसा असावा हे माहिती करून घ्या……” शीर्षक असलेल्या पोस्टमध्ये (https://edudaps.in/2021/03/31/resume/); Skills (कौशल्ये) विभागात या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.
Soft Skills (सॉफ्ट स्किल्स) म्हणजे काय?
ही कौशल्ये नोकरी/Domain specific कौशल्ये नाहीत. ही कौशल्ये अनुभवातून विकसित होतात. ही कौशल्ये तुमची मुलाखत पार पाडण्यासाठी तुम्हाला मदत करणार नाहीत परंतु ही कौशल्ये तुम्हाला नोकरीत टिकून राहण्यास मदत करतील.
एक व्यक्ती कामाच्या ठिकाणी इतर लोकांशी कसा संवाद साधू शकतो किंवा कामाच्या ठिकाणी समतोल कसा राखू शकतो हेच soft skills मधून सिद्ध करावयाचे असते.
सॉफ्ट स्किल्सची उदाहरणे
वेगवेगळी सॉफ्ट स्किल्स आहेत. खाली सॉफ्ट स्किल्सची उदाहरणे दिली आहेत.
उदा. सांघिक कार्य, संवाद कौशल्य, परस्पर कौशल्य, नेतृत्व, प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये इ.
Hard Skills आणि Soft Skills ही resume मध्ये कुठे समाविष्ट करायची?
खरं तर resume वर तुमची सॉफ्ट स्किल्स मांडणं खूप अवघड आहे. ही कौशल्ये कामाच्या ठिकाणी किंवा मुलाखतीदरम्यानही दाखवली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील blog वरील माहिती आपल्याला थोडक्यात उपयोगी पडेल.
निष्कर्ष
तर निष्कर्ष असा आहे की जर तुम्हाला व्यावसायिक जगात स्वतःला टिकवायचे असेल तर तुम्हाला Hard skills व soft Skills चे ज्ञान असायला हवे. म्हणून स्वतःवर काम करणे सुरू करा आणि hard व soft दोन्ही कौशल्यांमध्ये स्वतःला प्रशिक्षित करा.
शुभेच्छा……All the best!!!

[…] https://edudaps.in/2022/01/29/hard-skills-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-soft-skills-%e0%a4%ab%e0%a4%b0… […]