Site icon DAPS

मुलाखतीस जात आहात… तत्पूर्वी मुलाखती चे शिष्टाचार जाणून घ्या….

woman filling job application form in office with boss

Photo by Sora Shimazaki on Pexels.com

Advertisements

तुम्हाला मुलाखतीच्या शिष्टाचारांची माहिती आहे का? जर उत्तर “नाही” असे असेल तर मुलाखती चे शिष्टाचार आपणत्वरीत पाहू.

वेळेचे महत्व: मूलभूत मुलाखती चे शिष्टाचार

वेळेला खूप महत्व असते. मुलाखतीसाठी वेळेवर हजर राहा. आपण मुलाखतीच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिट आधी मुलाखतीचे नियोजित स्थळ गाठावे. ह्यावरून हे दर्शविते की आपल्याला वेळेचे मूल्य माहित आहे.

Photo by Oladimeji Ajegbile on Pexels.com

कागदपत्रे:

मुलाखतीसाठी आवश्यक असलेली सर्व ती कागदपत्रे घेऊन जा. (जसे कि Resume , स्वतःचा फोटो, सर्व ती जरुरी प्रमाणपत्रे, ई-मेलची कॉपी इ.).
मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी, आपणास जर का मुलाखत घेताना आवश्यक असलेल्या कागदपत्रांविषयी कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही संबंधित व्यक्तीस तुमची शंका विचारू शकता आणि तुमच्या शंकेचे निरसन करू शकता. मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता तपासा.

Photo by Karolina Grabowska on Pexels.com

वैयक्तिक सौंदर्य आणि शारीरिक स्वच्छता:

नेहमी चांगले तयार रहा. (ग्रुमिंग टिपा पहा: https://edudaps.in/2018/09/10/grooming-tips/ ) नेहमी लक्षात ठेवा की, “पहिली छाप ही शेवटची छाप असते.” नेहमी शरीराची योग्य निगा ठेवा. आपण बागेत फिरत आहात असे वागू नका.

मोबाइल फोन:

मुलाखत हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपण आपला मोबाइल फोन बंद केला आहे याची खात्री करा.

परवानगीः

मुलाखत हॉलमध्ये जाण्यापूर्वी नेहमीच दरवाजा knock करून परवानगी मागणें लक्षात ठेवा. परवानगी मागितल्याशिवाय मुलाखत हॉलमध्ये प्रवेश करू नका. आपण असे केल्यास आपण कदाचित मुलाखत घेणार्‍याच्या गोपनीयतेस त्रास देत असाल. मुलाखत घेणार्‍यालासुद्धा असे वाटेल की तुम्हाला अक्कल नाही किंवा साधे शिष्टाचार नाही.

हॉलमध्ये प्रवेश केल्यावर मुलाखत घेणाऱ्यास आपल्या चेहर्यावर स्मितहास्य देऊन हस्तांदोलन करा आणि खुर्चीवर बसण्याची परवानगी किंवा कोणत्याही बसण्यासाठी च्या जागेवर बसण्यासाठी परवानगी मागा. खुर्ची पकडून थेट त्यावर बसू नका.

जर आपल्याला प्रश्न समजत नसेल तर मुलाखत घेणाऱ्यास प्रश्न पुन्हा विचारण्यास सांगा. कारण एखाद्या प्रश्नांसाठी भलतेच उत्तर देण्यास काहीच अर्थ नाही.

जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर तुम्ही मुलाखत घेणाऱ्यास म्हणू शकता की, “सॉरी सर / मॅडम, मला उत्तर माहित नाही.” पण मुलाखत घेणार्‍याला फसवण्याचा प्रयत्न करू नका .

संभाषणः

मुलाखत घेणाऱ्या बरोबर नेहमीच सरळ आणि चांगले संभाषण ठेवा. मुलाखत घेणाऱ्याशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. त्याऐवजी आपण संबंधित विषयावर आपले विचार मांडू शकता. कोणतेही वाईट शब्द वापरू नका. कारण त्या ने काही साध्य होणार नाही.

कंपनीबद्दल आपली शंका दूर करणे: 

आपण त्या संस्थेतील नोकरी प्रोफाइल, working culture इत्यादींच्या संदर्भात आपल्या शंका दूर करू शकता.

टीपः जेव्हा आपण आपली मुलाखत पूर्ण करून बाहेर पडणार असाल त्या वेळेस मुलाखतदारास हात देऊन हस्तांदोलन करून आणि आपल्या चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवून धन्यवाद द्या .

शुभेच्छा !!!

For article in English, please follow the below link

Exit mobile version