DAPS

Let the next generation follow your footsteps....

वैयक्तिक सौंदर्य आणि स्वच्छता: टिप्स

Byabhijitk119

Aug 9, 2020
Photo by W R on <a href="https://www.pexels.com/photo/man-wearing-suit-jacket-dress-shirt-and-dress-pants-standing-near-wall-1450114/" rel="nofollow">Pexels.com</a>

वैयक्तिक सौन्दर्य आणि स्वच्छता …….

मित्रांनो आपल्याला लहानपणापासून शिकवलेले असते कि स्वतःची नीट स्वच्छता राखली पाहिजे किंवा वैयक्तिक सौंदर्य आणि स्वच्छता याची नीट काळजी घेतली पाहिजे. हि सवय जर का तुम्ही लहानपणीच व्यवस्थित आत्मसात केली असेल तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला आयुष्यभरासाठी होईल.

ज्यावेळी तुम्ही एखाद्या कंपनी मध्ये नोकरी करण्यासाठी जात असता किंवा एखाद्या कंपनीचे मालक असता त्यावेळी सर्वजण प्रथम किंवा प्रथम दर्शनी, “तुम्ही कसे दिसता?” ह्याचे निरीक्षण करतात. त्या वरून ते स्वतःच्या मनात तुमच्याबद्दल एक image / छाप तयार करतात. त्यासाठी तुम्हाला स्वतःला समोरच्या व्यक्तीवर कशी छाप पाडता आली पाहिजे ह्याचा विचार करून स्वतःच्या दिसण्यावर थोडे बदल केले पाहिजेत.

त्यामुळे जर तुम्हाला प्रथम दर्शनी जर छाप पाडायची असेल तर त्यासाठी काही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

केस:

कधीही fancy Hairstyle ठेवू नका. पुरुषांनी आपले केस खूप लांब ठेवू नये. केस व्यवस्थित विंचरलेले असले पाहिजेत.

पुरुषांनी आपली दाढी व मिशा व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. एकतर पुरुष्यानी आपली दाढी मिश्या ह्या मुंढवल्या पाहिजेत किंवा ट्रिम केल्या पाहिजेत. मोठी दाढी व मिश्या ठेवू नयेत. दाढी व मिश्यांची वाढ हि मर्यादित असली पाहिजे.

भुवया: जर तुमच्या भुवया व्यवस्थित नसतील तर कोरून घ्या.

आपल्या नाकातील केस तसेच कानातील व कानावरील केसदेखील ट्रिम करा.

काखेतील केसदेखील तुम्ही नियमितपने कापून घ्या. घामाच्या दुर्गंधीपासून सुटका करण्यासाठी Deodorant वापरा.

तोंडाची स्वच्छता:

तोंडाची स्वच्छता नियमितपणे राखल्याने तोंडाच्या आजारांपासून तसेच तोंडाच्या येणाऱ्या घाणवासापासून प्रतिबंध होऊ शकतो.

दिवसातून दोनवेळा दात घासा. दातांच्या मधील जागाही स्वच्छ करणे महत्वाचे आहे. हे Dental Floss वापरून केले जाऊ शकते.

तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी आपण माउथवॉश देखील वापरू शकता. जेवणानंतर कोमट पाण्याने चूळ भरा.

जर आपण मसालेदार जेवण घेत असाल तर आपल्या तोंडाला वास येईल, अशावेळी आपण Mouth freshener वापरू शकता. अन्यथा च्युइंगम वापरू शकता.

डोळे:

डोळे हे खूप नाजूक अवयव असतात. Fluppy Eyes पासून मुक्त होण्यासाठी रात्री कमीत कमी ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.

झोपण्याच्या अगोदर कमीत कमी २ तास आधी मद्यपान करू नका.

नखे :

आपली नखे हि व्यवस्थित कापली असली पाहिजेत.

त्यांना नेहमी स्वछ आणि कोरडे ठेवले पाहिजे. वाढलेल्या नखांमध्ये नेहमी घाण अडकून राहू शकते.

कपडे :

तुम्ही जेथे कुठे काम करत असाल तिथे परवानगी नसल्यास फॅन्सी कपडे घालू नका. खराब, फाटलेले किंवा मळलेले कपडे घालू नका.

नेहमी स्वच्छ व धुतलेले फॉर्मल कपडे (इस्त्री केलेले) घाला. शर्ट नेहमी पॅंट मध्ये व्यवस्थित खोचलेला असावा.

शक्य असल्यास, आपल्या मनगटी घड्याळाचा पट्टा, बेल्ट आणि आपल्या Shoes चे रंग जुळतील याची खात्री करा.

Shoes :

Formal shoes आणि धुतलेले Executive मोजे घाला. Shoes चांगले पुसून पॉलिश केलेले असले पाहिजेत. फाटलेले shoes आणि मोजे घालू नका.

For article in English, please follow the below link

https://edudaps.in/2018/09/10/professional-grooming-tips/

2 thoughts on “वैयक्तिक सौंदर्य आणि स्वच्छता: टिप्स”

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

https://upstox.com/open-account/?f=FWWH

Discover more from DAPS

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading