Site icon DAPS

Résumé आणि Curriculum Vitae (CV) यांच्यामधील फरक…..

person in black long sleeve shirt writing on white paper

Photo by cottonbro on Pexels.com

Advertisements

Résumé आणि Curriculum Vitae (CV) यांच्यामधील फरक काय आहे ?

बरेच लोक हे Résumé आणि Curriculum Vitae (CV) ह्या दोन शब्दानं मधील फरक करताना अनेकदा गल्लत करतात किंवा गोंधळून जातात.

जे कोणी फ्रेशर्स असतील किंवा जे कोणी नव्याने नोकरी शोधत असतात त्यांना या दोन शब्दांमधील फरक समजत नाही. त्यामुळे ते नोकरी अर्जावर त्या दोन शब्दांमधील (म्हणजेच Résumé किंवा Curriculum Vitae (CV))  कोणताही शब्द वापरतात व फसतात.

हे होऊ नये म्हणून आपण याला सोपे आणि स्पष्ट करूया.  जेणेकरून आपली गल्लत होणार नाही.

आपल्या ह्या होणाऱ्या गोंधळापासून मुक्त होण्यासाठी खाली काही फरक नमूद केलेले आहेत.

शब्दांचा अर्थ:  

Résumé” हा शब्द एक फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘Summary’ आहे. “Curriculum vitae (म्हणजे CV)” हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे “Course of life”. ह्या दोन शब्दांचा अर्थच आपल्याला आपल्या काही शंका दूर करण्यास मदत करतो.

ह्या दोन्ही शब्दांच्या अर्थामुळे आपण ह्या शब्दांमधील होणारी गल्लत थोड्या अंशी किंवा थोड्या प्रमाणात कमी करू शकतो.

ज्या वेळी आपण एखाद्या नोकरी साठी अर्ज करणार असू अशावेळी ह्या दोन्हीपैकी एखादे कागदपत्र आपण अर्जासोबत वापरात आणतो.

ह्या दोन्ही कागदपत्रांमध्ये मुख्य फरक म्हणजे त्या कागदपत्रांवरच्या असणाऱ्या माहितीची लांबी (पृष्ठांच्या संख्येनुसार). “Résumé”  हा एक किंवा दोन पृष्ठांचा असतो तर Curriculum vitae हा दोन किंवा दोन पृष्ठांपेक्षा जास्त पृष्ठांचा असतो.

Resume मध्ये असणाऱ्या माहितीची लांबी कमी आणि संकुचित असते (पृष्ठांच्या संखेनुसार), व curriculum vitae हा अधिक लांब असतो ज्यामध्ये व्यक्तीच्या अनुभवाविषयी, कौशल्यांबद्दल तपशीलवार माहिती असते किंवा तिच्या जीवनातील कामगिरीचे विहंगावलोकन असते.

थोडक्यात resume म्हणजे एखाद्या व्यक्तीचे / तिचे शिक्षण, कामगिरी, अतिरिक्त अभ्यासक्रम, प्रशिक्षण, कौशल्ये इत्यादींचा सारांश किंवा मूलभूत माहितीशिवाय दुसरे काहीच नसते, तर Curriculum vitae एखाद्या व्यक्तीबद्दल / तिचे शिक्षण, कौशल्य आणि अनुभवाबद्दल संक्षिप्त आणि तपशीलवार माहिती असते. कौशल्ये, ज्ञान, केलेल्या प्रकल्पाबाबत माहिती, प्रेझेंटेशंस, प्रसिद्ध जर्नल्समध्ये केलेली प्रकाशने, मागील संस्थेत किंवा संस्थांमध्ये कामाबद्दलची संक्षिप्त माहिती व केलेल्या कामगिरीची संक्षिप्त स्वरूपात माहिती इ. Curriculum vitae मध्ये नमूद करावे.

CV कधी वापरायचे आणि Resume कधी वापरायचे?


आणखी एक गोष्ट जी curriculum vitae आणि resume मध्ये फरक करते ती म्हणजे “अर्जाचा (ॲप्लिकेशनचा) उद्देश”.

जेव्हा जेव्हा आपण खासगी क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करत असाल तर आपण Resume हा वापरू शकता. जेव्हा आपण शैक्षणिक क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करत असाल किंवा पीएचडीसाठी अर्ज करत असाल तर curriculum vitae चा वापर करावा लागेल.

टीपः या शब्दाचा वापर देशानुसार बदलू शकतो. कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी कृपया वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणार्‍या संज्ञांबद्दल संशोधन करा. योग्य शब्दावली वापरा आणि नंतर संबंधित नोकरीसाठी अर्ज करा.

All the best!!!!

For article in English, please follow the below link

https://edudaps.in/2018/12/11/difference-between-resume-and-curriculum-vitae-cv/

Exit mobile version